पोस्ट्स

दिवाळी अंक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४

इमेज
४९ वी  राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४ दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ...... १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळीचे यंदा अमृतमहोत्सवी सांगता वर्ष साजरे करीत असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने  दरवर्षीप्रमाणे यंदाही ४९ वी  राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने १९७६ पासून मराठी भाषेची वैभवशाली दिवाळी अंक प्रदर्शन परंपरा जपली जाते आहे , या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात आणि परदेशात अमेरिका लॉस एंजिइल्स येथे पोहोचणार आहे.  या उपक्रमात गोरेगाव येथील मराठी विचारधारा प्रतिष्ठान ,  अमेरिकेतील लॉस एंजिइल्स येथील " मराठी     संस्कृती. com , - MCF Foundation - मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल ही संस्था सहभागी होत आहे.   या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अंक येत असतात.  सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कार तर आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक , सा...

मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपू या !

इमेज
  दिवाळी ! दिव्यांची आरास. रांगोळीचा थाट , पक्वानांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी ! दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह , उल्हासाचा उत्सव ! प्रसन्नतेचा उत्सव , प्रकाशाचा उत्सव. अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसानसातून झिरपत असते.   दिवाळी म्हणजे दीप मांगल्याचा सण. रोषणाई , फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा   एक अविभाज्य भाग आहे.   म्हणूनच दीपावली सणाची केवळ चाहूल सुद्धा अबाल वृद्धांना हर्षभरित करते. दिवाळी ' येते तीच मुळात हसत , खेळत , नाचत. सभोवताल प्रकाशाने , देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी , वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात , सुखासमाधात जावं , ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंगस्नानं , उटणी , मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास , अत्तरं , फराळ , फटाके , आकाशकंदील , पणत्या , रांगोळी , नवीन कपडे हे सारं असतंच , त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही! दिवाळीची चाहूल लागत...