पोस्ट्स

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अनाथांचा नाथ लोकनाथ म्हणजेच एकनाथ !

इमेज
  अनाथांचा नाथ लोकनाथ म्हणजेच एकनाथ !  ३० जून २०२२ एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशीच आज घडलेल्या सत्तास्थापनेची स्क्रिप्ट लिहिली गेली होती हे नक्की झाले. १०५ आमदार गाठीशी असूनही भाजपच्या दिल्लीश्वरांनी आज शपथ घेतलेल्या आणि त्यापूर्वी मुख्यमंत्रीपद भोगलेल्या देवाभाऊंना बाजूला सारून शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५१ आमदार सोबत घेऊन आलेल्या एकनाथ भाऊंना मुख्यमंत्री केले होते. फडणवीस साहेब त्यावेळी नाराज असल्याचे भासत होते किंवा तशा बातम्या माध्यमातून येत होत्या तरी ती घडामोड म्हणजे ठरवलेल्या पटकथेचा एक भाग होता हे आर एस एस च्या अभ्यासकांचे मत आहे. नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभेचा भरघोस निकाल लागला आहे आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यापूर्वीच निवडणूकीच्या निकालानंतर लगेच २-३ दिवसात झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विजयी सभेत बावनकुळे जेव्हा कार्यकर्त्यांना २०२९ मध्ये  भाजपला जिंकून स्वबळावर सत्तेत आणण्याचे आवाहन करतात हे त्याचेच द्योतक नव्हे काय? ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांचे 'झोत' हे ४५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले पुस्...

श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
  श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायनाचार्य हरिभाऊ रिंगे महाराजांचा सत्कार मुंबई : (रवींद्र मालुसरे ) आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिले. महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांनी त्यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू आणि ज्येष्ठ गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगे महाराजांना मानपत्र प्रदान करण्यात आले....