नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी मुंबईत साजरी
.jpeg)
जो देश इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोलही बिघडतो - वीरमाता अनुराधा गोरे नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी मुंबईत साजरी मुंबई (रवींद्र मालुसरे ) : जो देश इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोलही बिघडतो. एव्हढेच नव्हे तर त्या देशातील माणसे इतिहास घडवण्याची क्षमता सुद्धा निर्माण करू शकत नाहीत. दुर्दैव म्हणजे १९४७ नंतर आपला खरा इतिहास दडवून ठेवला गेला. नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज म्हणून मुंबईत हा शौर्य दिन मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करीत आहात तो हा क्षण आमच्यासाठी सुद्धा अभिमानाचा आहे. त्या निमित्ताने तुम्ही इतिहासाची उजळणी करीत आहात असे भावपूर्ण उद्गगार वीरमाता अनुराधा गोरे यांनी काढले. शिवसेना शाखाप्रमुख क्रमांक २० चे विजय मालुसरे आणि मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शौर्य दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे असेही म्हणाल्या की, ३५० वर्षांपूर्वी इतिहास घडवलेल्या एका पिढीचे तुम्ही वारस आहात हे कदापि विसरू नका. छत्रपतीं शिवाजी महाराजांचा जन्म पारतंत्र्यात झा...