सामाजिक कार्यकर्तृत्वाची चौथी माळ
डॉ . आनंदीबाई जोशी - पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई म्हणजे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होतं . हो ... एक मराठमोळी स्त्री भारताची पहिली महिला डॉक्टर होती . त्यांनी १८८६ मध्ये थेट अमेरिकेमधून डॉक्टरकी मिळवली होती . आनंदीबाईंचा जन्म सनातनी ब्राम्हण कुटुंबात झाला . आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते . त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुणे येथे झाला . वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे गोपाळरावांशी लग्न झाले . गोपाळराव विधुर होते आणि वयाने २० वर्षांनी मोठे hote. आनंदीबाईंपेक्षा तिप्पट मोठे होते . लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले . लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४ व्या वर्षी एका मुलास जन्म दिला . परन्तु दुर्दैवाने प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय संसाधने उपलब्ध नसल्याने आनंदीबाईना त्यांच्या पहिल्या मुलाला गमवावे लागले . . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . आनंदीबाईंचे पती गोपाळराव जोशी...