पोस्ट्स

नारायणदादा घाडगे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलादपूर तालुक्यातील श्री गुरुपरंपरा || गुरुवंदन ||

इमेज
  पोलादपूर तालुक्यातील श्री गुरुपरंपरा  || गुरुवंदन || पोलादपूर तालुका हा खरं तर वारकऱ्यांचा तालुका. वै गुरुवर्य ह भ प हबाजीबाबा,   वै गुरुवर्य ह भ प हनवतीबुवा,   वै गुरुवर्य ह भ प मारुतीबाबा मोरे,   वै गुरुवर्य ह भ प गणेशनाथ महाराज,   वै गुरुवर्य ह भ प रामचंद्र आ ढवळेबाबा,   वै गुरुवर्य ह भ प नारायणदादा घाडगे,   वै गुरुवर्य ह भ प श्रीपततात्या,   वै गुरुवर्य ह भ प मोरे माऊली अशी वारकरी सांप्रदायातली थोर परंपरा तालुक्याला लाभली आहे. वर उल्लेखिलेल्या श्रीगुरूंनी डोंगराळ भागात परमार्थ करताना आणि तो वाडीवस्तीवर रुजवताना निस्वार्थीपणे देवाची करुणा भाकली. ज्ञानदीप लावू जागी या उक्ती सार्थ करण्यासाठी अहोरात्र शरीर झिजवले. त्यामुळेच पोलादपूर तालुक्याला वारकऱ्यांचा तालुका अशी ओळख संपूर्ण महाराष्ष्ट्रात निर्माण झाली आहे. त्यांची पुढची पिढी सध्या हा वारसा चालवत आहे. त्यांनी तो विना अहंकार समर्थपणे चालवावा अशी प्रांजळ मागणी फक्त देवाकडे करू शकतो. खरा गुरु शिष्याला परिपूर्णतेने घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. अर्थार्जनाची, नावलौकिकाची अपेक्षा न...

।। तेचि पुरुष दैवाचे ।।

इमेज
  ।। तेचि पुरुष दैवाचे ।। नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे |  फुल्लार विंदायत पत्रनेत्र || येन त्वया भारत तैल पूर्ण: |  प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप || अशा तऱ्हेचा एखादा श्लोक   वाचला   की , मी ज्यांच्या सहवासात आलो अशा पोलादपूर तालुक्यातील उच्च , विशुद्ध दोन   महनीय व्यक्तींचे धवल चारित्र्यवान प्रसन्न चेहरे नजरेसमोर येतात. पहिले म्हणजे श्रीगुरु ह भ प वै नारायणदादा घाडगे आणि श्रीगुरु ह भ प वै ढवळेबाबा. जनसामान्यांना श्रीविठ्ठलासी एकरूप कसे व्हावे हे सोप्या भाषेत सांगण्यासाठी या दोघांना परमेश्वराने पोलादपूर तालुक्यातील  दुर्गम डोंगरदऱ्यांसारख्या प्रदेशात जन्माला घातले. पंढरपूर , मुंबई , खडकवाडी , रानवडी या चार ठिकाणी ऐन उमेदीत  मला   या दोन रम्याकृतीशी सातत्याने भेटता आले. त्यांच्या सहवासात राहाता आले आणि त्यांच्याशी मुक्तपणे बोलता आले. त्यांच्यात काय अनुभवता आले तर ज्ञान , विद्वत्ता आणि मार्दव यांचा मिलाफ म्हणजे दादा आणि बाबा ! गेल्या शतकात जन्मलेल्या तालुक्यातल्या बऱ्याचजणांना त्यांची योग्यता माहिती झाली होती. निरागसता , निर्व्याजता , कोमलता आण...