पोस्ट्स

छावा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया

इमेज
पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया.... मंत्री भरतशेठ गोगावले आणि प्रवीण दरेकर  मुंबई ( रवीन्द्र मालुसरे) : - सत्कारापेक्षा आम्ही तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो आहोत. आम्ही दोघेही खेडेगावात जन्मलो आहोत, रानावनात हिंडलो आहोत. मोठे झालो असलो तरी जमिनीवरून चालणारे आहोत. आपल्या तालुक्यातील डोंगर, दऱ्याखोरी, वाटा आम्ही धुंडाळल्या आहेत त्यामुळे आपले प्रश्न काय आहेत याची आम्हाला नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. तेव्हा आमच्या दोघांच्याही सत्तेच्या पदाचा लाभ या तालुक्याला व्हावा असे आम्हाला  वाटते आहे. यापुढच्या काळात आपण सर्वानी आपल्या पोलादपूर तालुक्याची अविकसित तालुका ही ओळख पुसूया अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूरवासियांना दिली. मुंबई-ठाणे येथील पोलादपूरवासियांच्या वतीने घाटकोपर मुंबई येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना भरतशेठ गोगावले बोलत होते. भरगच्च गर्दी झालेल्या या सभागृहात पोलादपूरचे सुपुत्र आणि  बहुचर्चित छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा नागरी स...

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

इमेज
श्री राजा शाहू  चरणी तत्पर कृष्णाजी  सुत आनाजी उतेकर किल्ले प्रतागडावरील भवानी आईच्या पूजेचा मान छत्रपती शिवाजी महाराज यांनी उतेकर घराण्याला दिला होता तेव्हा हा शिक्का शाहू महाराज यांनी उतेकर घराण्याला सरंजाम दिला तेव्हा हा शिक्का मोर्तब दिला होता. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत आणि मराठ्यांच्या इतिहासात  "उतेकर" या आडनावाचा अर्थ म्हणजे निष्ठा आणि पराक्रम! मध्ययुगीन आणि शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना याचे अनेक दाखले सापडतात.  शिवचरित्र साहित्य खंड १० कोकणच्या इतिहासाची साधने मध्ये पान नं २१ वर  याचा स्पष्टपणे उल्लेख सापडतो. उतेकर कुळ हे शिवरायांच्या स्वराज्यात गावाची पाटीलकी सांभाळत असत. शिवरायांशी प्रत्यक्ष संपर्कात असलेले महाड मधील वाळणच्या पाटलांचा उल्लेख इतिहासात  अढळतो. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात शिवरायांनी आपल्या विश्वासू मावळ्यांना वसवले होते. त्यात अनेक गावे उतेकरांची आहेत.  उतेकर कुळीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो. साताऱ्यातील जावळीच्या खोऱ्यातून सुरु झालेला प्रवास आज रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, सांगली, ठ...

अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

इमेज
अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे  रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज  यांची जयंती                                                 - रवींद्र मालुसरे अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा !   फाड देंगे मुघल सल्तनत की छाती  अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरुरत की… हम शोर नही करते, सिधा शिकार करते है..! अग्नि भी वो,  पाणी भी वो,  तुफान भी वो,  शेर शिवरायांचा छावा है वो !  मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील एक तेजस्वी पर्व मानले जाते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी धर्माभिमानी,स्वराज्यरक्षक,सकलशास्त्र पारंगत,उत्तम राजनीतिज्ञ,परमप्रतापी आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे छ्त्रपती संभाजी महाराज...

'छावा' चित्रपट अप्रतिम अभिनंद ! करमुक्त व्हावा

इमेज
'छावा' चित्रपट अप्रतिम अभिनंद न  ! करमुक्त व्हावा  आज सकाळीच छावा चित्रपटाचा पहिला शो पाहून आलो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती,परमप्रतापी, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर, शौर्यावर, बलिदानावर चित्रपट येतो आहे याची आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यात नक्की काय घडले ते कसे दाखवणार याची प्रचंड उत्कंठा गेल्या पंधरा दिवसापासून प्रेक्षकांना होतीच. भल्या पहाटे मला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिसला. या भारतभूमीची रक्षा करणाऱ्या हिमालयाची उंची या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांना लाभली असेच म्हणायला हवे. स्वराज्य म्हणजे काय ?  मराठा म्हणजे काय ? महाराष्ट्र 'महा' म्हणजे काय ?  स्वराज्यात संभाजी महाराजांच्या आयुष्यात काय घडले ? संभाजी महाराजांनी कशासाठी बलिदान दिले? या प्रश्नांची उत्तरे देशवासियांना हा चित्रपट पाहून समजतील. सुरुवातीपासून म्हणजे बुऱ्हाणपूरच्या लढाईपासून हा चित्रपट आपला ताबा घेतो. पुढे उत्कंठा वाढवत मन घट्ट करायला लावतो आणि शेवटी डोळ्यातून अश्रू ओघळवायला लावतो. चित्रपट निशब्द करतो.  चित्रपटातील भव्यता, व्यापकता, लढाई, शौर्य आणि कौर्य त्य...

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

इमेज
  लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा आकांक्षा पुढती गगन ठेगंणे... लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या  सिनेमा बद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे १४ फेब्रुवारीला त्यांचा हा बहुचर्चित सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे. अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna) संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा'बद्दल तेव्हापासून चर्चा आहे, जेव्हा याची घोषणा झाली होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता तेव्हा अधिक वाढली, जेव्हा ट्रेलर रिलीज झाला. विवाद वाढला, पण 'छावाने दर्शकांना रोमांचित केले. आता आगामी 'छावा' चित्रपट (Chhava Advance Booking Collection) प्रदर्शनापूर्वीच मालामाल झाला आहे. छावा चित्रपटाला नक्कीच जास्त स्क्रीन मिळतील आणि चित्रपट ब्लॉकबस्टर बनेल त्यात काही शंका नाही.. महाड तालुक्यातील बिरवाडी गावचे परंतु उर्वरित आयुष्य पुण्यात ...

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार

इमेज
लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार  अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा !    फाड देंगे मुघल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरुरत की… हम शोर नही करते, सिधा शिकार करते है..! अग्नि भी वो,  पाणी भी वो,  तुफान भी वो,  शेर शिवरायांचा छावा है वो !  राजे छत्रपती शिवरायांचे रयतेचे हिंदवी स्वराज्यआणि राजाभिषेक ज्या भूमीत स्थापन झाले आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या कर्तृत्ववाने रक्ताने लाल झालेल्या महाड - पोलादपूरच्या भूमीत जन्म झालेल्या लक्ष्मण उतेकर यांचा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या महापराक्रमाचा वेध घेणारा छावा हा चित्रपट येत आहे.   ज्या खोऱ्यातील मावळ्यांनी शिवरायांना प्रसंगी जीवाचे बलिदान देत साथ दिली त्या मावळ्यांचा वारसा लक्ष्मण उतेकर यांना लाभला आहे. उतेकरांच्या रक्तात 'शौर्य आणि निष्ठा' हा रक्तगट असल्यामुळे आणि इतिहासावर असलेल्या वेडापायी एव्हढे मोठे धाडस त्यांनी केले आहे. कॅमेरा अटेंडंट ते सुपरस्टार सिनेम...