पोस्ट्स

प्रवीण दरेकर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया

इमेज
पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया.... मंत्री भरतशेठ गोगावले आणि प्रवीण दरेकर  मुंबई ( रवीन्द्र मालुसरे) : - सत्कारापेक्षा आम्ही तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो आहोत. आम्ही दोघेही खेडेगावात जन्मलो आहोत, रानावनात हिंडलो आहोत. मोठे झालो असलो तरी जमिनीवरून चालणारे आहोत. आपल्या तालुक्यातील डोंगर, दऱ्याखोरी, वाटा आम्ही धुंडाळल्या आहेत त्यामुळे आपले प्रश्न काय आहेत याची आम्हाला नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. तेव्हा आमच्या दोघांच्याही सत्तेच्या पदाचा लाभ या तालुक्याला व्हावा असे आम्हाला  वाटते आहे. यापुढच्या काळात आपण सर्वानी आपल्या पोलादपूर तालुक्याची अविकसित तालुका ही ओळख पुसूया अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूरवासियांना दिली. मुंबई-ठाणे येथील पोलादपूरवासियांच्या वतीने घाटकोपर मुंबई येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना भरतशेठ गोगावले बोलत होते. भरगच्च गर्दी झालेल्या या सभागृहात पोलादपूरचे सुपुत्र आणि  बहुचर्चित छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा नागरी स...