रंगधर्मी अजित भगत : नाट्यविद्यापीठ आणि प्रायोगिक नाटकाचे शेवटचे भीष्माचार्य - रवींद्र मालुसरे

रंगधर्मी अजित भगत : नाट्यविद्यापीठ आणि प्रायोगिक नाटकाचे शेवटचे भीष्माचार्य - रवींद्र मालुसरे मुंबई (प्रतिनिधी ) : मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या पायाचे जे काही घट्ट दगड इतिहासात होऊन गेले त्यातला एक पायरीचा दगड...म्हणजे अजित भगत. दादरच्या आविष्कार मध्ये म्हणजे छबिलदास शाळेचा दुसऱ्या मजल्यावर जी आधाराची वा हक्काची आपली वाटावी अशी जी माणसे त्यात अरुण काकडे सर, सीताराम कुंभार आणि अजित भगत सर होते, मात्र त्यापेक्षा ज्या रंगभूमीची धूळ आपण गुलालासारखी कपाळाला लावली त्या पायरीचा आपण अविभाज्य भाग आहोत ह्याचा अभिमान मला जास्त महत्वाचा आहे असे भगत सर स्वतःला समजत असत. अजित भगत यांच्या निधनाने प्रायोगिक नाटक 'जगणारे रंगधर्मी', चालते बोलते नाट्यविद्यापीठ'. प्रायोगिक नाटकाचे 'शेवटचे भीष्माचार्य' आपल्यातून कायमचे विंगेत गेले आहेत असे भावपूर्ण उदगार रवींद्र मालुसरे यांनी काढले. श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान मुंबई आयोजीत नाट्यतपस्वी अजित भगत स्मृती जागर नुकताच यशवंत नाट्य मंदिरच्या मिनी थिएटर मध्ये नुकताच साजरा झाला त्यावेळी मालुसरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नाट्यचळवळीसाठी गेली ...