पोस्ट्स

वाचक संवाद लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*वाचक संवाद*

इमेज
*या संपादकाने पाडला आयुष्यावर प्रभाव* लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले  लहानपणापासुनच दररोज वर्तमानपत्र वाचण्याची -खरं तर त्या वयात वर्तमानपत्र पहाण्यात किंवा चाळण्यातच - अधिक मजा असावयाची , मात्र रोजच्या रोज *लोकसत्ता* घरीच येत असल्यामुळे वाचावयास मिळे ! बालोद्यान , क्रीडाजगत , नाटक - सिनेमा जाहिराती या पलिकडे फारसे वाचन जात नसे ! अग्रलेख किंवा संपादक वगैरेचा काहीच गंध नव्हता ! त्यावेळी लोकसत्तेचे संपादक कै. ह. रा. महाजनी होते आमच्या जवळच एक सदगृहस्थ (मोहन नेरुरकर) रहात , ते अधुनमधुन वर्तमानपत्रांत कविता , चुटकले पाठवित व ती छापुन आली माझ्या वडिलांना दाखविण्यास येत त्यांच्या गप्पा गोष्टीतुन वर्तमानपत्रीय लिखाणाचे कुतुहल आणि गोडी लागली!वय वाढले थोडे शहाणपण , समज आली वाचनाबरोबरच लिखाणाची आवड लागली अर्थातच पत्रलेखन सुरु करावयाचे वाटले,लोकसत्तेपासुनच सुरवात केली ! अग्रलेख वाचुनच संपादकांना प्रतिक्रिया कळवू लागलो लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले यांचे लिखाण प्रेरणादायी ठरले *अण्णा गोखले* म्हणजे बहूआयामी व्यक्तिमत्व ! संस्कृत - उर्दू भाषेवरील त्यांचे प्रभुत्वतसेच अतिशय मि...