महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप
राजसत्तेतल्या कारभारणी ..... महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप स्नेहल माणिकराव जगताप ... महाडचे एक कल्पक नेतृत्व , धाडसी निर्णय क्षमता घेणारे उमदे व्यक्तिमत्त्व , आणि माणिकराव जगताप तथा आबाची राजकारणातली ' सावली ; म्हणून ओळखली जाणारी त्यांची कन्या. याशिवाय अल्पावधीतच महाड-पोलादपूर-माणगाव या तालुक्यातील जनतेच्या मनामनात घर करणाऱ्या , कार्यकुशल आणि प्रचंड मेहनती वृत्ती असणाऱ्या राजकारणातील कारभारीण.... महाड हे शहर पूर्वीपासून एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी वीरेश्वर देवस्थानच्या गाडीतळावर मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगड किल्ला निवडल्यानंतर तर मराठ्यांच्या इतिहासात महाडचे भौगोलिक महत्व अधिक वाढले हा इतिहास आहे. त्यानंतर तर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेंब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहराला ऐत्याहासिक , सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा इतिहास वारसा लाभत गेला त्यात अधिकाधिक भर पडत गेली. महाड-पोलादपूर हा मतदारसंघ हा तसा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा