पोस्ट्स

साखर गाव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा

इमेज
नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा सुभेदार नरवीर तान्हाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गावाचे ग्रामदैवत आई नवलाई-भैरी यांची पुनः प्राणप्रतिष्ठा ( जीर्णोद्धार ) आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा दिनांक २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण दोन दिवस धार्मिक आणि पारंपरिक रितिरिवाज पूर्ण करून पोलादपूर तालुक्यात संपन्न होत असल्याचे अध्यक्ष विनायकदादा मालुसरे आणि संतोष महादेव मालुसरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले आहे. ग्रामदैवतांची उत्पत्ती भारताच्या प्राचीन धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक परंपरांशी निगडित आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण आणि इतर ग्रामीण भागांमध्ये ग्रामदैवतांना फार पुरातन काळापासून महत्त्व आहे. ग्रामदैवतांचा उगम कसा झाला, याविषयी अनेक दंतकथा, लोककथा, आणि धार्मिक आख्यायिका आहेत. आमच्या साखर गावाबाबतही असेच म्हणावे लागेल. प्राचीन काळात नैसर्गिक संकटे, राक्षसी शक्ती आणि जंगलातील प्राण्यांपासून गावे सुरक्षित नव्हती. देवावर श्रद्धा ठेवणारी साधी - भोळी माणसं असलेल्या गावकऱ्यांना त्यांच्या ज...

नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरेंच्या साखर गावात ऐत्याहासिक कार्याची मुहूर्तमेढ

इमेज
  नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरेंच्या साखर गावात ऐत्याहासिक कार्याची मुहूर्तमेढ निवृत्त सैनिक नायक पंढरीनाथ मालुसरे   यांची    भव्य मिरवणूक आणि सत्कार   इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा  सुभेदार नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गांवातील देशसेवेतून निवृत्त झालेले सैनिक नायक पंढरीनाथ मालुसरे यांची ग्रामस्थांकडून पितळवाडी फाट्यापासून गावापर्यंत ग्रामस्थांनी त्यांची विविध फुलांच्या हारांनी सजविलेल्या ओपन जीपमधून सपत्नीक ढोल ताश्यांच्या आवाजात आणि फटाक्यांची आतषबाजी करून भव्य मिरवणूक काढून शेकडो समाजबांधवांच्या साक्षीने सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या निमित्ताने सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर जवानाचे स्वागत करण्याचा हा प्रयत्न पोलादपूर तालुक्यात आणि नरवीर तान्हाजी - सूर्याजी यांचा वारसा सांगणाऱ्यांकडून   एक नवीन पायंडा पडला असून , या कृतीचे स्वागत करताना इतर ग्रामस्थांनी सुद्धा हा आदर्श घ्यावा अशा   महाड -पोलादपूर तालुक्यातील जनतेमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.   बेळगाव येथे भारतीय सैन्यदलात 6 मराठा लाईट इन्...