पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक दस्ताऐवज
पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक दस्ताऐवजाचा मागोवा . आज राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाभिषेक दिन, जग जिंकता येऊ शकते हा आत्मविश्वास या मातीला मिळाला, तो रुजला तो आजचा दिवस. पोलादपूर तालुक्यातील मावळे या शुभ कार्यात राजांच्या सोबत होते. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे (उमरठ), सुभेदार सूर्याजी मालुसरे (साखर), नरवीर मुरारबाजी देशपांडे (किंजळोली), गोदाजी जगताप (सांदोशी) अशा अनेकांनी प्राणाची आहुती देत शिवरायांना मोलाची साथ दिली होती याची नोंद अनेक बखरकारांनी घेतली आहे. प्रतापगड ते रायगड या दरम्यानच्या भूभागाने शिवाजी राजांना स्थैर्य दिले. बारा मावळातील वतनदारांचे वर्तन स्वराज्याच्या कामी सहकार्याचे आणि भेदाभेद करणारे आहे हे स्वराज्याचे तोरण बांधताना लक्षात आल्यावर,महाराजांनी राजगड आणि पुणे परिसर सोडून घनदाट जावळीतील अरण्याचा आसरा घेतला नाही तर स्व-राज्य स्थापन करण्याचे मातोश्री जिजाऊंचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे महाराज जाणून होते. इतिहासाचा धांडोळा घेत असताना मला एक प्रश्न निर्माण झाला होता, गेल्या शेदीडशे वर्षांत अनेकांनी पाहिलेली अन अनुभवलेली बलदंड आणि धिप्पाड शिवाय अचाट ताकदीची...