पोस्ट्स

भरतशेठ गोगावले लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना

इमेज
 नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना  रोजगार हमी,फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद  मी .... भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित.....  रोजगार हमी,फलोत्पादन मंत्रिपदाची शपथ घेताना आमदार भरत गोगावले यांच्या तोंडून हे शब्द महाड -पोलादपूर-माणगावकरांनी ऐकले आणि एकच जल्लोष गावागावात वाडीवस्तीवर उसळला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी सत्तातंर झाल्यानंतर आलेल्या मंत्रिमंडळात खरे तर भरतशेठ गोगावले यांचा सर्वाधिक हक्क होता. याचे कारण महाआघाडीचे सरकार जाण्यासाठी जे घडले होते त्यात आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आणण्यात त्यांचा वाट महत्वाचा होता. त्याला रायगडमधील सत्ता संघर्षाबरोबर दुसरी आर्थिक बाजुही होती.  आघाडी सरकार स्थापन झाल्याबरोबर आदिती तटकरे पालकमंत्री झाल्याबरोबर अगोदर स्थानिक पातळीवर व नंतर राज्यपातळीवर ही अस्वस्थता पोहोचली होती. २० जुनला बंड झाले परंतु त्याअगोदर ६ महिने भविष्यात मंत्रिपद जवळ आलेय जरा धीर धरा असे सकारात्मकरित्या जवळच्या कार्यकर्त्यांना भरतशेठ ठामपणे हे सांगत होते. परंतु...

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

इमेज
  कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे झालेले अकाली निधन त्यावेळी महाड - पोलादपूरकरांच्या मनाला चटका लावणारे होते.  बातमी घेऊन येणारी  त्या दिवसाची  स काळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक दुःख देणारी होती. माणिकराव यांच्यावर मुंबईत कोरोना आजारात रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. दुर्दैवाने आपल्यातला काळाने एक मोठी क्षमता असलेले नेता आपल्यातून हिरावून नेला होता.   माणिकराव जगताप यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला होता. सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी अभ्यासू वृत्तीने तळमळीने झटणारा लोकनेता होता तो. माणिकरावांचे आणि माझे व्यक्तिगत पातळीवर   संबंध अतिशय जवळचे मित्रत्वाचे होते. माणिकरावांची आणि माझी सामाजिक-ऐत्याहासिक प्रश्नावर अधूनमधून अनेकवेळा चर्चा व्हायची, एकमेकांची फोनाफोनी असायचीच. माझी आणि त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाली. आमच्या खडकवाडी गावच्या 'मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने' वर्धापन दिन...