पोस्ट्स

कॉ. जयवंत पाटील लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष - कॉ प्रकाश रेड्डी मुंबई : (रवींद्र मालुसरे) स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणून निर्माण झालेल्या या शहराचा पायाभूत विकास व्हावा यासाठी निर्भीडपणे व अभ्यासपूर्ण भाषणांनी ज्यांनी सभागृहात आणि स्वच्छ चारित्र्याने जनमानसावर छाप पाडली अशा दिवंगत कॉम्रेड जयवंत पाटील यांची जन्मशताब्दी प्रभादेवीकर वर्षभर साजरी करणार आहेत ,  लोकांचा हा व्यक्त होणारा कृतज्ञता भाव म्हणजेच त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावती आहे असे उदगार महाराष्ट्रातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी काढले. प्रभादेवी येथील आगरी सेवा संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की ,  कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष असलेला तो काळ होता. मधू दंडवते यांनी दादरमधून निवडणूक लढण्याचा हट्ट त्यावेळी सोडला असता तर अल्प मतांनी पराभूत झालेले कॉ जयवंत पाटील लोकांचा एक आमदार म्हणून सभागृहात गेले असते. ...