पोस्ट्स

आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या आंदोलनाला यश

इमेज
आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या आंदोलनाला यश  आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, कार्याध्यक्ष संजय उतेकर आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे💐 मनापासून अभिनंदन ! मागच्या दोन वर्षांपासून या संघटनेने जनसामान्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर संघटनेने हा प्रश्न धसास लावण्यासाठी सामोपचाराची आणि प्रसंगी आंदोलनाची त्याचबरोबर यापुढच्या काळात कार्यालयासमोर रेड्यांच्या झोंबी लावण्याची भूमिका घेतली होती.........  कालपासूनच जुने मीटर बदलून नवीन मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे. प्रत्येक गावातील नादुरुस्त मिटर्स आहेत त्यांची यादी घेऊन वायरमन फिरत आहेत, स्थानिक गावकऱ्यांनी आपले नाव तपासून मीटर लगेच बदलून घ्यावे....विनायक चोरगे, रितेश डवळे, संजय पिंगळे हे कर्मचारी फोटोत काम करताना दिसत आहेत. 💪 बदलासाठी अद्दल घडवण्याची जोरदार परखड भूमिका घेतली की काय होऊ शकते. हे भूमिपुत्रांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.... 🚩लढवय्यांच्या भूमीत भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या नवतरुण कार्यकर्त्यांनो असेच जोमाने एकजुटीने कार्यरत रहा!.... ...