पोस्ट्स

डोंबिवली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

इमेज
संकल्पपूर्ती दाता :  स्व. तानाजीदादा मालुसरे  १३ सप्टेंबरला पहाटे गाढ झोपेत असताना मोबाईल वाजला. फोनमधून आवाज आला... तानाजीआण्णा सिरीयस आहेत , तुम्ही बाजीराव नानांना घेऊन लगेच डोंबिवलीला या. मनात शंकेची पाल चूकचुकली. सकाळी ६ . ३०   वा जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा तो निचेष्ठ पडलेला देह आणि वहिनीने दुःखाने फोडलेला हंबरडा खूपच अस्वस्थ करून गेला. त्या दिवशी डोंबिवलीत पहिल्यांदाच तानाजीदादा यांच्याशी न बोलता पाऊल ठेवत होतो. एकतर तो बोलवायचा किंवा मी माझ्या इतर कामासाठी गेलो तरी फोनवर सांगायचो मी अमुक ठिकाणी आलोय. मन सैरभैर झाले... गावाच्या किंवा डोंबिवलीतील त्याच्या अनेक कार्यक्रमांच्या अगोदर त्यांच्याशी केलेली चर्चा , घेतलेले मार्गदर्शन , गावाची पिढ्यानपिढ्याची नांदणूक , कुळाचार आणि शिवकालीन इतिहास, वारकरी संप्रदाय वादविवाद तसेच वेळोवेळच्या राजकीय घडामोडी यावर अनेक वेळा तासनतास चर्चा केलेल्या आठवणी मनात उसळून येऊ लागल्या... आणि जाणवले अगदी घट्ट धरून ठेवणारा आधार आपल्यापासून कायमचा सुटलाय ! माणसाचा मृत्यू  हे  मानवी जीवनातील त्रिकाळाबाधित सत्य होते त...