मराठी भाषा अभिजात बरोबर व्यावहारिक व्हायला हवी - सचिन परब
एआय साठी मराठी भाषेतून मजकूर (कन्टेन्ट ) ऑनलाईन जायला हवा.
मुंबई (रवींद्र मालुसरे ) - अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी याचा प्रचार करण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने संकल्प केला आहे, अभिजात बरोबर ती अधिकाधिक व्यवहारी कशी होईल यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे. याचबरोबर कृत्रिम प्रज्ञा (एआय ) व्यवहारात मराठी अधिक उपयोगासाठी आणण्यासाठी त्याप्रमाणे मजकूर संगणकात लिहायला हवा असे विचार ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी एकनाथ आव्हाड, कामगारनेते दिवाकर दळवी, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, चितळे उद्योगसमूहाचे राहुल जोगळेकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेक्रेटरी यतीन कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग उपस्थित होते.
या कार्यक्रमात संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील मनोरंजनकार' का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - नवलाई डोंबिवलीकर,निसर्गोत्सव कोल्हापूर सकाळ, संस्कार भक्तिधारा, कालनिर्णय, कोकणसाद, शब्दशिवार,सृजनदीप, पुढारी दीपस्तंभ, चांगुलपणाची चळवळ, नवाकाळ, मीडिया वॉच, उद्याचा मराठवाडा, नवभारत, कलासागर, द इनसाईट या उत्कृष्ट दिवाळी अंकांचा विविध पुरस्कार देऊन सचिन परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी भाषा व्यवहाराविषयी बोलताना ते पुढे असेही म्हणाले की, आज याठिकाणी भानुदास साटम सरांनी एआय तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त यावर व्याख्यान दिले. परंतु काही विषय या तंत्रज्ञानाला मांडतानाच येणार नाहीत. एखादी प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन केलेले रिपोर्ताज एआय कसे तयार करणार. संत तुकारामांच्या विषयी जगभरातील जवळ जवळ सर्व भाषांमधून लिहिले गेले आहे त्यामुळे त्यांची ओळख सर्वत्र झाली आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेची ओळख अथवा माहिती जगभर व्हावी असे वाटत असेल तर त्यासंबंधीचा मजकूर (कन्टेन्ट ) ऑनलाईन जायला हवा. आज व्यक्त होण्याची अनेक साधने निर्माण झाली आहेत. यापुढे आवश्यक तो इतर भाषेतून मराठीतून संवाद साधला तरच आपण काय म्हणतो आहोत हे इतरांना कळेल. म्हणजेच आपल्याला यापुढे मुलांच्या भाषेत बोलावे लागणार आहे. पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही दैनिकातील संपादकीय पानावरील एक कोपरा व्यक्त होण्यासाठी सर्वसामान्यांसाठी हक्काचा आहे. त्या मंडळींची ही संस्था आहे, या संस्थेत आजपर्यंत अनेक दिग्गज मान्यवर येऊन गेले आहेत. मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो.
फुलामुलांत रमणारे लेखक प्रसिद्ध बालसाहित्यिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक एकनाथ आव्हाड आपल्या भाषणात म्हणाले की, पुस्तकं माणूस जोडण्याचे काम करतात, म्हणूनच आपण पुस्तकांना आपले मित्र म्हणतो. लेखकांची आणि पुस्तकांची ताकद मोठी असून दर्जेदार पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. पुस्तकांशी मैत्री करा, स्वप्नं बघा, परंतु त्यासोबत एखादी कलाही जोपासा.कलेमुळे जीवनाचा खरा आनंद तुम्हांला मिळेल वाचनाचा छंद तुम्हाला जीवन कसं जगायचं ते शिकवेल.
ज्येष्ठ कामगार नेते दिवाकर दळवी यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि सरकारचे मराठी भाषेविषयीचे धोरण याची अभ्यासपूर्ण मांडणी आपल्या भाषणात केली. रवींद्र मालुसरे यांनी अभिजात मराठी भाषा उपक्रमाचे स्वरूप आणि संस्थेच्या कार्याची ओळख प्रास्ताविक केले. उपस्थितीचे स्वागत प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, सूत्रसंचालन कार्यवाह नितीन कदम, राजन देसाई, तर आभार प्रदर्शन दिगंबर चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष विजय ना कदम, मनोहर साळवी, सुनील कुवरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, आबास आतार, अरुण खटावकर, दिलीप ल सावंत, केतन भोज यांनी विशेष मेहनत घेतली. वाचन चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते दादर सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष दिवंगत दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ ग्रंथ सखा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यावर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागाला तो प्रदान करण्यात आला.
संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील पुढील अंकांच्या संपादकांना गौरविण्यात आले. मनोरंजनकार का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - नवलाई आम्ही डोंबिवली (संपादक - रवींद्र चव्हाण /कार्यकारी संपादक - प्रभू कापसे ), चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक - निसर्गोत्सव, कोल्हापूर (संपादक - निखिल पंडितराव), पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक - संस्कार भक्तिधारा, पुणे (संपादक - विद्यावाचस्पती कांचन सातपुते ), पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक - कालनिर्णय, मुंबई (संपादक - जयराज साळगावकर ), पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - कोकणसाद, सावंतवाडी (संपादक - संदीप देसाई ), साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक - शब्दशिवार, सोलापूर ( संपादक - ऍड कुमुदिनी मगर /कार्यकारी संपादक -आव्हाड एकनाथ, स्वातंत्र्यसेनानी मनोहरपंत चिवटे स्मृती सर्वोत्कृष्ट आरोग्य विषयक अंक - सृजनदीप, हडपसर (संपादक - डॉ राहुल झांजुर्णे ), सीताराम राणे - पुढारी दीपस्तंभ, कोल्हापूर (संपादक - सचिन परब ),
आवाजकार मधुकर पाटकर - सुवर्णधन, सोलापूर (संपादक - प्रो. डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण ), मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - चांगुलपणाची चळवळ, पुणे (संपादिका - शुभांगी नितीन मुळ्ये ), कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक - नवाकाळ, मुंबई (संपादक - रोहित पांडे ), प्रतापराव माने स्मृती - मीडिया वॉच, अमरावती (संपादक - अविनाश दुधे ), ग शं सामंत स्मृती उत्कृष्ट अंक - उद्याचा मराठवाडा, नांदेड (संपादक - राम शेवडीकर ), दत्ता टिपणीस स्मृती उत्कृष्ट अंक - नवभारत, वाई (संपादक - अशोक जोशी ), शरद वर्तक - कलासागर, पिंपरी (संपादक - शिरीष पदकी / मकरंद गांगल ), पत्रकार नितीन चव्हाण स्मृती उत्कृष्ट अंक - द इनसाईट, पुणे (कार्यकारी संपादक - प्रतिक कोसके), विशेष सत्कार - बृहन्महाराष्ट्र वृत्त, शिकागो (संपादक-प्रसाद पानवलकर ), स्मरणिका, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर (संपादक - सचिन गांजापूरकर ), कनक रंगवाचा, कणकवली (संपादक - वामन पंडित ), विनर्स, पुणे (संपादक - विनोद शिंदे ), सर्वोत्तम, इंदूर ( (संपादक-अश्विन खरे ), दरवर्षी आम्ही एकूण २५ दिवाळी अंकांचा सन्मान करतो परंतु संस्थेच्या चळवळीचे यंदाचे वर्ष हे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे, त्यामुळे आम्ही ५० दिवाळी अंकांचा सन्मान करीत आहोत. ऋतूपर्ण, पुणे (संपादक - शरद गोगटे ), अक्षरमुद्रा, (संपादक-दिपक चिद्दरवार ), दक्षता, मुंबई (संपादक-विजय खरात, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य ), वारसा, अहमदनगर (संपादक-जयंत येलूलकर ), आनंदतरंग, पुणे, शब्दगांधार, पुणे २ (संपादक - डॉ अरविंद नेरकर / चारुशीला बेलसरे ), पर्ण, पुणे (संपादक-अपर्णा कुलकर्णी-नाडगौडी ), शब्दवेल, पनवेल (संपादक - देवेंद्र इंगळकर ), अपेक्षा, पुणे (संपादक - दत्तात्रय उभे ), भावार्थ, चिपळूण (संपादक - प्रसन्न करंदीकर ) कमांडर, बेलापूर (संपादक-डॉ राजू पाटोदकर ), नृत्यावकाश, पुणे (संपादक - सायली कुलकर्णी, आश्लेशा महाजन ), गुंफण, सातारा (संपादक-बसवेश्वर चेणगे ), आर्याबाग, पुणे (संपादक - विश्वास कणेकर ), शब्दोत्सव, सांगली (संपादक - हृदयनाथ सावंत ), सृजनसंवाद, ठाणे (संपादक - गीतेश शिंदे ), नवरंग रुपेरी, संभाजी नगर (संपादक - अशोक उजळंबकर ), कोकण मीडिया, रत्नागिरी (संपादक-प्रमोद कोनकर ), ठाणे नागरिक, ठाणे (संपादक-सतिषकुमार भावे ), मनोकल्प, पुणे (संपादक-अपर्णा चव्हाण ), मोडीदर्पण, मुंबई (संपादक - सुभाष लाड ), अधोरेखित, वसई (संपादक - डॉ पल्लवी परुळेकर बनसोडे ), क्रिककथा, पुणे (संपादक - कौस्तुभ चाटे ), अनघा, ठाणे (संपादक-सौ विद्या नाले ), पुरुष स्पंदनं, मुंबई (संपादक - हरीश सदानी ), अक्षरदान, पुणे (संपादक-मोतीराम पौळ ), दिवेलागण, (संपादक - प्राजक्ता ऐनापुरे - सणस ),हॅश टॅग, डोंबिवली (संपादक- डॉ योगेश विजय जोशी ), पद्मरत्न, इचलकरंजी (संपादक-रागिणी जगदाळे ), अर्थशक्ति, मुंबई (संपादक - रमेश नार्वेकर ), गावगाथा, अक्कलकोट (संपादक-धोंडप्पा नंदे), दुर्गांच्या देशातून (आळंदी) (संपादक-संदीप तापकीर ), जलोपासना (कल्याण ) (संपादक-डॉ दत्ता देशकर ), मनःशक्ती, लोणावळा (संपादक - वर्षा तोडमल), शब्दोत्सव, अमरावती (संपादक-ऍड. प्रीती बनारसे ),लेखी संवाद (सुधीर क्षीरसागर ) या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रत्युष जाहिरात कंपनीचे मालक दत्ता मालप आणि केळकर वझे कॉलेजचे ग्रंथपाल सुनील सुर्वे यांनी काम पहिले. तर अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया या लेखस्पर्धेत अर्चना शुक्ला (प्रथम क्रमांक ), रश्मी फडणवीस (द्वितीय क्रमांक ), स्वामिनी निष्कालानंद (तृतीय क्रमांक ), ऍड मनमोहन चोणकर, सुनील कुवरे, राजन देसाई, श्री अमित बर्वे, श्री. सूर्यकांत भोसले, श्री मनोहर जोगळेकर, श्री अनंत बोरसे, श्री प्रशांत शिरुडे, वर्षा झांबरे, डॉ प्रभाकर चांदकर, कामिनी सुरेश खाने, डॉ यशवंत सुरोशे यांनी लेख पाठवून भाग घेतला होता.
1 टिप्पण्या
मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ व मराठी विचारधारा प्रतिष्ठान चा दरवर्षी चा मराठी भाषा दिन सोहळा २७. फेब्रुवारी रोजी समर्पक पणे साजरा करण्यात आला लेखक कवि नेते सर्व वृत्तपत्र लेखकांनी हजेरी लावली तर महाराष्ट्र नव्हे तर परदेशातून दिवाळी अंक स्पर्धे साठी आले होते ही आनंदाची बाब आहे म्हणजे मराठी चा झेंडा परदेशातून ही फडकला हे म्हणावं लागेल
उत्तर द्याहटवा