पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले पोलादपूर (रवींद्र मालुसरे) - रायगड जिल्ह्याला विशेषतः महाड आणि पोलादपूर तालुक्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रागैतिहासिक काळापासून मानवी संस्कृतीची जडण-घडण आपल्या जिल्ह्यात होत असल्याचे ठोस पुरावेदेखील अलिबाग, महाड सारख्या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात तर या भूमीत जन्मलेल्या शूरवीर मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्याच्या स्थापनेसाठी मोलाची कामगिरी केली. नरवीर तान्हाजी मालुसरे, नरवीर सूर्याजी मालुसरे, नरवीर मुरारबाजी देशपांडे, परमानंदबाबा, रायगड किल्ला, कांगोरी किल्ला, चंद्रगड किल्ला वैगरे इतिहासाच्या अनेक ऐत्याहासिक वारसाच्या खुणा अस्तित्वात आहेत. या वारशाची महती जगाला पटवून देण्यासाठी पर्यटनासारखा दुसरा पर्याय नाही. पर्यटन आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, भौगोलिक स्थळांचा अतिशय नजीकचा संबंध येतो. कधीकाळी इतिहासाची सुवर्णपाने असलेली ही स्थळे जपण्याचा त्यांचे संवर्धन करण्याचा आटोकाट प्रयत्न मी करणार आहे. म...