'छावा' चित्रपट अप्रतिम अभिनंद ! करमुक्त व्हावा

'छावा' चित्रपट अप्रतिम अभिनंद न ! करमुक्त व्हावा आज सकाळीच छावा चित्रपटाचा पहिला शो पाहून आलो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती,परमप्रतापी, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर, शौर्यावर, बलिदानावर चित्रपट येतो आहे याची आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यात नक्की काय घडले ते कसे दाखवणार याची प्रचंड उत्कंठा गेल्या पंधरा दिवसापासून प्रेक्षकांना होतीच. भल्या पहाटे मला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिसला. या भारतभूमीची रक्षा करणाऱ्या हिमालयाची उंची या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांना लाभली असेच म्हणायला हवे. स्वराज्य म्हणजे काय ? मराठा म्हणजे काय ? महाराष्ट्र 'महा' म्हणजे काय ? स्वराज्यात संभाजी महाराजांच्या आयुष्यात काय घडले ? संभाजी महाराजांनी कशासाठी बलिदान दिले? या प्रश्नांची उत्तरे देशवासियांना हा चित्रपट पाहून समजतील. सुरुवातीपासून म्हणजे बुऱ्हाणपूरच्या लढाईपासून हा चित्रपट आपला ताबा घेतो. पुढे उत्कंठा वाढवत मन घट्ट करायला लावतो आणि शेवटी डोळ्यातून अश्रू ओघळवायला लावतो. चित्रपट निशब्द करतो. चित्रपटातील भव्यता, व्यापकता, लढाई, शौर्य आणि कौर्य त्य...