पोस्ट्स

दुर्गमहर्षी आप्पा परब लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलादपूर स्नेहसंमेलन सत्कारमूर्तींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय

इमेज
पोलादपूर तालुक्यातील मुंबई - ठाणे येथील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे मुख्य पाहुणे म्हणून दुर्गमहर्षी आप्पा परब तर लक्ष्मण उतेकर यांची मुलाखत घेण्यासाठी साहित्यिक प्रल्हाद जाधव उपस्थित होते. या संमेलनात माननीय लक्ष्मण उतेकर, नामदार भरतशेठ गोगावले साहेब, आमदार प्रवीणभाऊ दरेकर, मा संजीव धुमाळ, स्वप्निल पांडुरंग चव्हाण, डॉ ओंकार मारुती कळंबे, कुमार संग्राश निकम, नेहा विलास शिरावले, ऍड निलेश मारुती जाधव यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय :- माननीय लक्ष्मण उतेकर - सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नाव असलेले लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावचे. लक्ष्मण हे मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधासुधा मुलगा, सामान्य बुध्दिमत्तेचा मापदंड असलेला चारचौघांसारखा. वडीलांना शेतीकामात मदत करताना शेत नांगरणे, गाई-बैलांना चारा घालणे, गाईचे दुध काढणे या सगळ्या गोष्टी लक्ष्मण उतेकर यांनी केल्या आहेत. या सर्व काबाडकष्टांचे मला भांडवल करायचे नाही कारण माझ्या आयुष्यातील हे सर्व क्षण मी सकारात्मक जगलो,...