पोस्ट्स

आषाढी यात्रा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा

इमेज
  ' मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा ' रवींद्र मालुसरे   महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते ,  तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके  सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावर ,  ग्यानबा-तुकारामांच् या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात  विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि ...

लोकदेव पांडुरंगाचा महिमा

इमेज
लोकदेव पांडुरंगाचा महिमा वारी   शब्दाचा   अर्थ   म्हणजे   येरझार .  पंढरपूरची   वारी   करावयाची   म्हणजे   आपल्या   घरुन   पायी   चालत   पांडूरंगाच्या   भेटीला   पंढरपुरला   जायचे   आणि   भगवंताला   भेटून   परत   घरी   यायचे .  वारकरी   वर्षातून   अनेकदा   वारीला   जातात .  पंढरीचा   वारकरी  |  वारी   चुको   न   दे   हरी  ||  या   उदात्त   भावनेने   लाखोंच्या   संख्येने   भक्तगण   या   पायी   वारीमध्ये   सहभागी   होतात आणि   चालत   २१   दिवसांचा   प्रवास   करत   पंढरपूर   च्या   विठ्ठलाला   येऊन   भेटतात . अनेक   भक्त   एकत्र   येऊन   भजने   गात ,  कीर्तने   करीत   पंढरपूरला   पायी   जातात   तेव्हा   त्यांच्या   समूहाला ...