पोलादपूर-महाड : शौर्याची परंपरा
पोलादपूर-महाड : शौर्याची परंपरा - रवींद्र मालुसरे गडकिल्ले आणि दुर्गम दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला पोलादपूर - महाड तालुका हा रणभूमीवर लढणाऱ्या प्रसंगी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा. पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्हा हा सुभेदार नरवीर तानाजी - सूर्याजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे , मुरारबाजी देशपांडे यांच्यापासून शूरवीरांचा जिल्हा आहे. या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाल्यानंतर तेव्हापासून विरांना प्रसवणारी ही भूमी आजपर्यंत शौर्याने तळपत आहे. शिवकाळात , पेशवाईत , ब्रिटिश काळात व देश स्वातंत्र्य झाल्यानंतर वेळोवेळी या दोन्ही तालुक्यातील अनेक वीर पुरुषांनी पराक्रम केला व आपल्या नावाची व अद्वितीय पराक्रमाची नोंद इतिहासाच्या पानापानावर करून ठेवली आहे. आमचा साखर गाव तर या देव , देश , व धर्म कार्यात नेहमीच अग्रेसर राहात आला. शिवकाळात सुभेदार तान्हाजी - सूर्याजी मालुसरे , पहिल्या जागतिक महायुद्धात सुभेदार भाऊराव मालुसरे तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सेनानी अंबाजीराव मालुसरे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाना पुरोहित यांच्या सोबत स्वातंत्र्य ...