पोस्ट्स

ढवळेबाबा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

।। तेचि पुरुष दैवाचे ।।

इमेज
  ।। तेचि पुरुष दैवाचे ।। नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे |  फुल्लार विंदायत पत्रनेत्र || येन त्वया भारत तैल पूर्ण: |  प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप || अशा तऱ्हेचा एखादा श्लोक   वाचला   की , मी ज्यांच्या सहवासात आलो अशा पोलादपूर तालुक्यातील उच्च , विशुद्ध दोन   महनीय व्यक्तींचे धवल चारित्र्यवान प्रसन्न चेहरे नजरेसमोर येतात. पहिले म्हणजे श्रीगुरु ह भ प वै नारायणदादा घाडगे आणि श्रीगुरु ह भ प वै ढवळेबाबा. जनसामान्यांना श्रीविठ्ठलासी एकरूप कसे व्हावे हे सोप्या भाषेत सांगण्यासाठी या दोघांना परमेश्वराने पोलादपूर तालुक्यातील  दुर्गम डोंगरदऱ्यांसारख्या प्रदेशात जन्माला घातले. पंढरपूर , मुंबई , खडकवाडी , रानवडी या चार ठिकाणी ऐन उमेदीत  मला   या दोन रम्याकृतीशी सातत्याने भेटता आले. त्यांच्या सहवासात राहाता आले आणि त्यांच्याशी मुक्तपणे बोलता आले. त्यांच्यात काय अनुभवता आले तर ज्ञान , विद्वत्ता आणि मार्दव यांचा मिलाफ म्हणजे दादा आणि बाबा ! गेल्या शतकात जन्मलेल्या तालुक्यातल्या बऱ्याचजणांना त्यांची योग्यता माहिती झाली होती. निरागसता , निर्व्याजता , कोमलता आण...