पोस्ट्स

रमेश परब लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !

इमेज
  प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन ! राजकीय आणि  दैनंदिन सामाजिक जीवनात उत्तुंग विचारांची उंची असलेली आणि  सतत   प्रभादेवी आणि दादर विभागात वावरणारी हसतमुख व्यक्ती म्हणजे माझे मित्र आणि  सर्वांच्या परिचयाचे 'जगनमित्र' म्हणजे रमेश परब ! आज पहाटे वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर दुःखाची हळहळ व्यक्त करणारे त्यानंतर अनेकजण भेटले. शरीराने कमी उंचीचे परंतु सृदुढ बांध्याचे असलेल्या रमेश परब यांची मुंबई आणि कोकणातल्या राजकारणाच्या अभ्यासाची उंची व जाण मात्र फार प्रगल्भ होती. साधारण १९८० च्या विद्यार्थी दशेपासून मी त्यांच्या संपर्कात आलो आणि पक्का मित्र झालो. देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार साहेब आणि कुठल्याही राजकीय पेचप्रसंगात मुंबईत  शरद पवारांना खंबीर साथ सोबत करणारे स्वर्गीय गोविंदराव फणसेकर या दोघांचा  लाडका 'मानसपुत्र' म्हणूनही रमेश यांची ओळख होती.  शरदरावांनी राजकीय जीवनात कोणतीही बरी वाईट घेतलेली भूमिका असो गोविंदराव आणि त्यांच्यानंतर रमेश परब यांनी सातत...