ऋतुजा राजेश मालुसरे यांना इंग्लंड येथे मास्टर्स पदवी प्रदान
ऋतुजा राजेश मालुसरे यांना इंग्लंड येथे मास्टर्स पदवी प्रदान कु.ऋतुजा राजेश मालुसरे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेत असताना इंग्लंड येथील न्यु कँसल युनिव्हर्सिटी - टेने अपॉन , ( इंग्लड) UK येथे मास्टर्स इन अर्बन प्लॅनिंग अँन्ड डेव्हलपमेंट या विषयात मास्टर्स ही पदवी प्राप्त केली आहे. युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात Prof. Dame Anne Johnson यांनी पदवीपत्र सन्मानपूर्वक प्रदान केले. या विषयात असे यश मिळवणारी ऋतुजा पोलादपूर तालुक्यात प्रथमच असावी. याच युनिव्हर्सिटीत यापुढे ती असोसिएशट प्रोफेसर म्हणून रुजू होत आहे. ऋतुजाचे शालेय शिक्षण हॉली क्रास हायस्कूल परेल मुंबई , प्राथमिक शिक्षण बारावी सायन्स महर्षि दयानंद कॉलेज परेल मुंबई तर पदवी शिक्षण मनोहर फाळके आर्किटेक्ट कॉलेज मुंबई मुंबई विद्यापीठ येथून घेतले आहे. काल LIVE कार्यक्रम पाहिल्यानंतर ऋतुजाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. रवींद्र मालुसरे अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 9323...