जहांगीर कला दालनात मल्लिकार्जुन सिंदगी यांचे "होरायझन"
जहांगीर कला दालनात मल्लिकार्जुन सिंदगी यांचे " होरायझन " मुंबई ( रवींद्र मालुसरे ) : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महासंघाचे अध्यक्ष राहीलेले ज्येष्ठ चित्रकार मल्लिकार्जुन सिंदगी यांचे " होरायझन " प्रदर्शन दि . १४ते २०मे च्या दरम्यान जहांगीर कला दालनात सुरू आहे . या प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती पाहतांनाच त्यांच्या कला प्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे . चित्रकार श्री . मल्लिकाजूर्न सिंदगी सरांचा परिचय फार मोठा आहे . त्यांच्या परिचयाचा सारांश रूपाने परिचय करून देत त्यांच्या कलाकृतींचा परिचय रसग्रहण स्वरूपात करणे जास्त रास्त राहिल . घरामध्ये कोणत्याही प्रकाराचा कलेचा वारसा नसलेल्या परिस्थिती मधून चित्रकार मल्लिकार्जून सिंदगी यांनी कलेचे शास्त्रीय पद्धतीने शिक्षण टप्याटप्याने पूर्ण करून , प्रपंच भागवण्यासाठी अंदाजे 37 ते 38 वर्षापूर्वी कलाशिक्षकाची सेवा स्विकारून ते मुख्याध्यापक पदावरून सेवा निवृत्त झालेले आहेत . कलाशिक्षक मुख्याध्यापक पदी निवड होणारे चित्रकार श...