पोस्ट्स

चित्रपट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चित्रपट अभिनेत्रीची दुनिया

इमेज
  अभिनेत्री सीमा देव चा इंग्रजीचा क्लास ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव गिरगावहून माहीमला राहायला आल्या होत्या तेव्हाची गोष्ट. चित्रपटात आहोत म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायला यायलाच पाहिजे या हेतूने त्यांनी शिकवणी लावायची ठरवली. एक ख्रिश्चन मुलगी त्यांना शिकवण्यासाठी आणि संभाषण करण्यासाठीचा  सराव  करून देण्यासाठी  त्यांच्या घरी येऊ लागली. परंतु शूटिंगच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसे. ती मुलगी दररोज येऊन जात असे . परंतु झाले मात्र असे सीमा देव याना इंग्रजीचा सराव  देणे राहिले बाजूला ती मुलगीच छानपैकी मराठीचा सराव करून गेली.   झीनत अमानची ' मोलकरीण ' झीनत अमानला एकदा तिच्या घरी कपडे धुण्यासाठी एका मोलकरीणीची गरज होती. ही बातमी ऐकून एक जण तिच्याकडे आली.  झीनतने तिची इंटरव्हियू घ्यायला सुरुवात केली. तिला प्रश्न विचारला , यापूर्वी तू कोठे नोकरी करत होतीस ? ती म्हणाली ...राखी गुलजार कडे झीनत म्हणाली ,' मग ती नोकरी सोडून माझ्याकडे नोकरी का करावीशी वाटतेय तुला ? राखीपेक्षा मी अधिक लोकप्रिय आहे म्हणून का ? नाही मॅडम , मग माझ्याकडे नोकरी का...

"शहेनशहा अमिताभ आणि दिवार"

इमेज
  'शहेनशहा अमिताभ' हे बाबूमोशाय यांचे पुस्तक वाचून झाल्यानंतर कालच (२९ सप्टेंबर) दादर सार्वजनिक वाचनालयाला परत केले, ...…आणि आज संध्याकाळी ७ वा टेलिव्हिजनच्या ZEE CLASSIC चॅनेलवर 'दिवार' चित्रपट सुरु झाला, पूर्ण पाहिला. Thanks Zee Classic चित्रपटाचे बारीकसारीक तपशील पुन्हा पाहण्याची संधी दिलीत, त्याचबरोबर माझे आवडते अभ्यासू लेखक महाराष्ट्र टाईम्सचे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई (बाबू मोशाय या नावाने लेखन करणारे ) यांना सुद्धा सॅल्युट करतो. त्यांनी लिहिलेले अमिताभचे चरित्र परिपूर्ण आणि वाचनीय आहे. अमिताभच्या चित्रपटांचं, त्यातील त्यांच्या भूमिकांचं विश्लेषण करून ते थांबत नाहीत. हरिवंशराय व तेजी बच्चन या माता-पित्यांनी त्याचं लालनपालन कसं केलं, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी होत गेली, त्याच्यावर कशा प्रकारचे संस्कार झाले, यासंबंधीचा बारीकसारीक तपशील बाबू मोशाय पुरवतात. अमिताभची उमेदवारीच्या काळातील धडपड, त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीचा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास, त्याच्या समकालीन चित्रपटांचं स्वरूप, त्याचा पडता काळ याचं सखोल, साधार चित्रण लेखकानं केलं ...