पोस्ट्स

मराठी अभिजात भाषा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मराठी अभिजात भाषा चला ज्ञानभाषा करू या! उपक्रमाचा शुभारंभ मराठी भाषा प्रेमीना आवाहन

इमेज
महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, दिवाळी अंक - मासिकांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, मराठी नाट्य-चित्रपट कलावंत, मराठी भाषा प्रेमी यांना आवाहन  मुंबई : अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे, पण हा मिळालेला दर्जा टिकविण्यासाठी प्रयत्न करणं त्याहून महत्त्वाचं ठरणार आहे. दोन हजार वर्षांहून अधिक काळाची समृद्ध साहित्यिक परंपरा असलेली मराठी भाषा आणि तिचे साहित्य आपल्या पुढच्या पिढींपर्यंत टिकवून ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी झालेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु खऱ्या अर्थाने ती आज अभिजात राहिली आहे का ? यापुढे ती ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व क्षेत्रातील मराठी भाषिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन दादरमध्ये काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या वतीने साजरा करण्यात आला याप्रसंगी मालुसरे बोलत होते. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर चर्चा सविस्तर चर्चा करण्यात आली...