माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे - आप्पा परब
माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे - आप्पा परब डोंबिवली : (रवींद्र मालुसरे) कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले, तर उत्तरेकडून आलेले हिरवे वादळ कसे रोखावे हे राणी ताराबाई यांनी स्त्री शक्तीची ताकद दाखवून शिकवले. त्यामुळे नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करुन जगा असे प्रतिपादन दुर्गसंशोधक लेखक बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांनी रविवारी डोंबिवलीत केले. परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले कलामंदिरात पार पडलेल्या चतुरंगच्या ३२ व्या रंगसंमेलनात आप्पा परब यांना जीवनगौरव पुरस्काराने दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्याहस्ते गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आप्पांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारी मान्यवरांचे लेख असलेली डायरीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी परबांच्या पत्नी अनुराधा, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ पत्...