पोस्ट्स

मंगलप्रभात लोढा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी वृत्तपत्र लेखन महत्त्वाचे - ना. मंगलप्रभात लोढा

इमेज
  वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृतमहोत्सवी वर्षाला प्रारंभ मुंबई : (रवींद्र मालुसरे)  -   सोशल मीडियावरील सामाजिक पत्रकारितेच्या वाढत्या प्रसारामुळे , ‘ वर्तमानपत्रांतील वाचकांची पत्रे’ हा स्तंभ यापुढे दुबळा होत जाईल अशी भीती वाटत असली तरी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच सत्ताधारी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी संपादकीय पानावरील त्यांची हक्काची जागा अबाधित राहणे गरजेचे आहे. बोधकथेतील लहानशी चिमणी आपल्या चोचीत पाणी आणून   जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न करते ,  याची इतिहासाने नोंद घेतली आहे असेच तुम्ही करीत आहात. त्यामुळे तुम्ही आणि प्रिंट मीडियाने दर्पणपासून सुरू झालेली ही परंपरा टिकवण्यासाठी जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे मत राज्याचे मंत्री ना मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. दादर येथील काणे उपाहारगृहाच्या सभागृहात वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. या वेळी व्यासपीठावर संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे ,  उद्योजक सुरेशराव कदम ,  कामगार नेते दिवाकर दळवी ,  सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मणिशंकर कवठे ,...