संजीव धुमाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संजीव धुमाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र संजीव धुमाळ यांना राष्ट्रपती पदक




पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र 

संजीव धुमाळ यांना राष्ट्रपती पदक

मुंबई  (रवींद्र मालुसरे ) : रायगड जिल्हयातील पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र संजीव दत्तात्रय धुमाळ यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील सर्वोच्च राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. संजीव धुमाळ हे रबाळे पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
धुमाळ यांची सन १९९५ साली पोलीस उप निरीक्षक म्हणुन निवड झाल्यानंतर ते एक वर्षाचे नाशिक येथील प्रशिक्षण संपवुन सांताक्रुझ पोलीस ठाणे व त्यानंतर मुंबई गुन्हे शाखा येथे एल-९ बांद्रा व त्यानंतर खंडणी विरोधी कक्ष यामध्ये एकुण १८ वर्षे उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक महत्वाच्या गुन्हयांची उकल करून अंडरवर्ल्डच्या बऱ्याच गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन वाशी पोलीस ठाणे व न्हावा शेवा पोलीस ठाणे येथे त्यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावताना कायदा व सुव्यवस्थेचा समतोल राखला तसेच आता सध्या रबाळे पोलीस येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन कर्तव्य बजावत आहेत. सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीमध्ये आपले कौशल्य पणाला लावुन सर्वात जास्त बुथ असलेले पोलीस ठाणे असताना देखील कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची कसोशीने काळजी घेतली.
पोलीस दलाच्या एकुण ३० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना २५० पेक्षा अधिक पारितोषिके मिळाली आहेत. अशा धडाडीच्या अधिकाऱ्याला उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर होऊन गौरविण्यात आले आहे.३० वर्षाच्या सेवेमध्ये सुमारे २५० पारितोषिकांचे मानकरी ठरलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ याना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल नवी मुंबई पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 



वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...