पोस्ट्स

स्नेहल जगताप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

इमेज
  कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे झालेले अकाली निधन त्यावेळी महाड - पोलादपूरकरांच्या मनाला चटका लावणारे होते.  बातमी घेऊन येणारी  त्या दिवसाची  स काळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक दुःख देणारी होती. माणिकराव यांच्यावर मुंबईत कोरोना आजारात रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. दुर्दैवाने आपल्यातला काळाने एक मोठी क्षमता असलेले नेता आपल्यातून हिरावून नेला होता.   माणिकराव जगताप यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला होता. सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी अभ्यासू वृत्तीने तळमळीने झटणारा लोकनेता होता तो. माणिकरावांचे आणि माझे व्यक्तिगत पातळीवर   संबंध अतिशय जवळचे मित्रत्वाचे होते. माणिकरावांची आणि माझी सामाजिक-ऐत्याहासिक प्रश्नावर अधूनमधून अनेकवेळा चर्चा व्हायची, एकमेकांची फोनाफोनी असायचीच. माझी आणि त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाली. आमच्या खडकवाडी गावच्या 'मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने' वर्धापन दिन...

स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता

इमेज
  स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता  कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे होते. त्या दिवशी बातमी घेऊन येणारी सकाळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक होती.  सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला , मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा माणिकरावांच्या रूपाने लोकनेता हरपला होता. व्यक्तिगत पातळीवर माझे संबंध अतिशय जवळचे होते.  काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी आणि मी निकटचा सहकारी गमावला होता. त्यांच्या जाण्याने कोकणातील राजकीय क्षेत्रातील  कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले , देश , राज्य , कोकण एका स्वच्छ , पारदर्शी आणि उच्चशिक्षित राजकारण्यास मुकला आहे. तरूण , निष्ठावंत , प्रचंड क्षमता असलेले आणि जबरदस्त उमदे नेतृत्व त्यामुळे काळाच्या पडद्याआड गेले.  अत्यंत कमी वयात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप पाडली होती.  काँग्रेसचे युवा नेते , माजी आमदार माणिकरावांच्या निधनानं महाराष्ट्रानं , देशानं एक अभ्यासू , कार्यकुशल , नेतृत्व गमावले आहे. जनसामान्यांशी एकरूप असलेला , विकासासाठी झटणारा लोकनेता हर...