पोस्ट्स

फौजी आंबवडे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलादपूर-महाड : शौर्याची परंपरा

इमेज
पोलादपूर-महाड  : शौर्याची परंपरा - रवींद्र मालुसरे गडकिल्ले आणि दुर्गम दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला पोलादपूर - महाड तालुका हा रणभूमीवर लढणाऱ्या प्रसंगी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा. पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्हा हा सुभेदार नरवीर तानाजी -   सूर्याजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे , मुरारबाजी देशपांडे यांच्यापासून शूरवीरांचा जिल्हा आहे. या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाल्यानंतर तेव्हापासून विरांना प्रसवणारी ही भूमी आजपर्यंत शौर्याने तळपत आहे. शिवकाळात , पेशवाईत , ब्रिटिश काळात व देश स्वातंत्र्य झाल्यानंतर वेळोवेळी या दोन्ही तालुक्यातील अनेक वीर पुरुषांनी पराक्रम केला व आपल्या नावाची व अद्वितीय पराक्रमाची नोंद इतिहासाच्या पानापानावर करून ठेवली आहे. आमचा साखर गाव तर या देव , देश , व धर्म कार्यात नेहमीच अग्रेसर राहात आला.   शिवकाळात सुभेदार तान्हाजी - सूर्याजी मालुसरे , पहिल्या जागतिक महायुद्धात सुभेदार भाऊराव मालुसरे तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सेनानी अंबाजीराव मालुसरे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाना पुरोहित यांच्या सोबत स्वातंत्र्य ...

फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

इमेज
युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे - वीरमाता अनुराधा गोरे फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न मुंबई (रवींद्र मालुसरे) :-  युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे . देशसेवा करण्यासाठी विविध सेवा मार्ग   खुले आहेत . त्यासाठी जिद्दीने अभ्यास करा , आत्मविश्वासाने व पूर्ण तयारीने विविध स्पर्धात्मक परीक्षण सामोरे जा . स्वतंत्र्य भारताचे नागरिक म्हणून आपण विविध हक्कांची मागणी करतो . आपल्याला सुरक्षितता हवी असते मात्र देशाच्या सुरक्षिततेचा विचार आपण विशेषतः युवा पिढी करणार आहे की नाही . देशाचे भविष्य घडविणे तुमच्या हाती आहे असे आवाहन शहिद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले . शेकडो युवा - युवतींना प्रेरित करताना अनेक प्रासंगिक उदाहरणे ओघवत्या शब्दात देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना दादर येथे मार्गदर्शन केले .  महाड येथील फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने पंचक्रो...