कालिदासाची प्रतिभा : मेघदूत
कालिदासाची प्रतिभा : मेघदूत महाकवी कालिदास कुणाला माहिती नाही. फक्त भारतीयच नव्हे तर सगळे जग हा थोर कवी आणि नाटककार होता असे मानते. पण त्याच्याबद्दल म्हणजे वैयक्तीक आयुष्याबद्दल फारसे काही काळात नाही. कविकुलगुरू कालिदासाविषयी आतापर्यंत पुष्कळ संशोधन झाले आहे. त्याचा काल , त्याचे जन्मस्थान , त्याचा नाश्रयदाता विक्रमादित्य , त्याचे ग्रंथ , त्याचे विचार वगैरेविषयी अनेक विद्वानांनी चर्चा केली आहे. तथापि बद्यापि त्याच्या स्थलकालाविषयी आणि त्याच्या जीवनातील घटनांविषयी विद्वानांचे एकमत झाले नाही. त्याविषयी विविध तर्क केले जातात. इतिहास पंडितांच्या अभ्यासानुसार तो सम्राट विक्रमादित्याच्या पदरी होता. त्यामुळे कालिदासाचा काल बहुधा इ स पूर्व पहिले शतक असा येतो. तर पाश्चत्त्य पंडितांच्या मते कालिदास ११ व्या शतकातील धारा नगरीचा राजा भोज ह्याच्या पदरी होता. गेल्या दशकात कर्नाटकात काही पुरावे सापडल्यानंतर कालिदास ४ थ्या किंवा ५ व्या शतकाच्या कालखंडात होऊन गेला असावा असे माननाल्या सबळ पुरावा आहे. भविष्यात अजून काही पुरावे, शिलालेख, जुनी हस्तलिखिते साप...