लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा
.jpeg)
लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा आकांक्षा पुढती गगन ठेगंणे... लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या सिनेमा बद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे १४ फेब्रुवारीला त्यांचा हा बहुचर्चित सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे. अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा'बद्दल तेव्हापासून चर्चा आहे, जेव्हा याची घोषणा झाली होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता तेव्हा अधिक वाढली, जेव्हा ट्रेलर रिलीज झाला. विवाद वाढला, पण 'छावाने दर्शकांना रोमांचित केले. आता आगामी 'छावा' चित्रपट (Chhava Advance Booking Collection) प्रदर्शनापूर्वीच मालामाल झाला आहे. छावा चित्रपटाला नक्कीच जास्त स्क्रीन मिळतील आणि चित्रपट ब्लॉकबस्टर बनेल त्यात काही शंका नाही.. महाड तालुक्यातील बिरवाडी गावचे परंतु उर्वरित आयुष्य पुण्यात ...