पोस्ट्स

मराठी भाषा अभिजात लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मराठी भाषा अभिजात बरोबर व्यावहारिक व्हायला हवी - सचिन परब

इमेज
मराठी भाषा अभिजात बरोबर व्यावहारिक व्हायला हवी - सचिन परब एआय साठी मराठी भाषेतून मजकूर (कन्टेन्ट ) ऑनलाईन जायला हवा. मुंबई (रवींद्र मालुसरे ) - अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी याचा प्रचार करण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने  संकल्प केला आहे, अभिजात बरोबर ती अधिकाधिक व्यवहारी कशी होईल यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे. याचबरोबर कृत्रिम प्रज्ञा (एआय ) व्यवहारात मराठी अधिक उपयोगासाठी आणण्यासाठी त्याप्रमाणे मजकूर संगणकात लिहायला हवा असे विचार ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी एकनाथ आव्हाड, कामगारनेते दिवाकर दळवी, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, चितळे उद्योगसमूहाचे राहुल जोगळेकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेक्रेटरी यतीन कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग उपस्थित होते. या कार्यक्रमात संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या...