पोस्ट्स

मंगेश चिवटे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रुग्णांची संजीवनी : मंगेश चिवटे

इमेज
  रुग्णांची संजीवनी : मंगेश चिवटे  प्रार्थनेसाठी जोडणाऱ्या दोन हातापेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात चांगला असतो अशी निःस्वार्थ समाज सेवेची एक ओळख सांगितली जाते. सतत हसतमुख राहात जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत रात्री-अपरात्री मदतीचा हात असाच नेहमी पुढे करणारा अवलिया म्हणून मंगेश चिवटे यांची ओळख महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात झाली आहे. अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला लागल्याचे दिसून आले होते. मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती. महाड-चिपळूण - इरसाळ वाडी पूरग्रस्तांसाठी तातडीने धावून जाणे अशा अनेक प्रसंगामुळे मंगेश चिवटे यांनी स्वत:चेही एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  मंगेश चिवटे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. त्यांनी मुंबईत अनेक वृत्तवाहिन्यांसाठी वार्ताहार म्हणून काम केलं आहे. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात चिवटे यांनी स्टार माझा, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, साम टी व्ही, आय बी एन लोकमत या वाहिन्यांमध्ये विविध पदांवर काम केले. सुमारे २०० हून अधिक नेत्यांच्या मुलाखती घेतल...