पोस्ट्स

बैल दिवाळी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

इमेज
बैल दिवाळी इतिहास , संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी म्हणजे थोरली दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्वाचा मोठे अप्रूप असलेला हा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदा’ या दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात व धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदीपावली(बैलदिवाळी ). शेतक-यांची ही दिवाळी म्हणजे एक आनंदाचा, उत्सवांचा जल्लोष असतो. पोलादपूर तालुक्यात या बैल दिवाळी ला मोठी दिवाळी म्हणून संबोधले जाते.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा हा दिवस. गाई, बैल, वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या देवदीपावलीचा  उत्साह आबालवृद्धांच्या अंगी संचारलेला असतो. दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीच्या सणामागील आशय मात्र आपल्याला फार थोडा माहिती असतो. जरा विस्ताराने जाणून घेऊया दिवाळी सणाची माहिती -  कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. हजारो वर्षांपासून मानवा...