पोस्ट्स

संत ज्ञानेश्वर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लोकदेव श्रीविठ्ठल, वारकरी संप्रदाय आणि संतांची भूमिका

इमेज
  लोकदेव श्रीविठ्ठल , वारकरी संप्रदाय आणि संतांची भूमिका श्रीविठ्ठलाला विष्णु-कृष्ण-रूपाचा , वैष्णव चरित्राचा आणि तदनुकूल पावित्र्यसंभाराचा लाभ झाला , तो महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील श्रीक्षेत्र पंढरपूर नामक क्षेत्रात हे आपल्याला माहीत आहे. पंढरपूर क्षेत्रात विठ्ठलाचे वैष्णवीकरण इ. स. च्या तेराव्या शतकापूर्वीच पूर्णता पावले होते असे पंढरपूरमध्ये उपलब्ध झालेल्या प्राचीन कोरीव लेखांवरून , तेराव्या शतकातील मराठी संतांच्या वाङ्मयातील उल्लेखां वरून आणि निःसंदिग्ध प्रमाणांनी हेमाद्रिपूर्वकालीन ठरलेल्या स्कांद ' पांडुरंगमाहात्म्या ' वरून दिसून येते. ज्ञानेश्वरकालीन सामाजिक परिस्थितिचे वर्णन करताना हा काळ धर्मग्लानीचा होता. " क्षीणः कालय- शात्पुनस्तरुणतां धर्मोऽपि सम्प्रापितः ' असे त्या काळाचें वर्णन जरी हेमाद्री पंडितांच्या राजप्रशस्तीत केलेलें असले , तरी तें वस्तुस्थितीला धरून नाहीं. त्या काळात वैदिक परंपरा निष्प्रभ झाली होती , बदलत्या परिस्थितीप्रमाणें समाजाला नवी प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या धर्मसंस्थेत उरला नव्हता , म्हणूनच अवच्या पंचवीस वर्षांत दक्षिणेंतील बहुते...