पोस्ट्स

इलेक्ट्रॉनिक मिडिया लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

इमेज
सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे ,  विसावे शतक चिंतेचे म्हणून ओळखले जाते ! तर एकविसावे शतक माहिती-तंत्रज्ञान  युगांचे संबोधले जात आहे. इंग्रजांची राजवट असतानाच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले वर्तमानपत्र सुरु केले होते. त्यामागे गतकाळाचे संपन्न बुद्धिवैभव व विचारसंपदा एका  पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावी ,  आपला समृद्ध वारसा ,  ही प्रभावशाली  परंपरा अखंडितपणे चालावी ,  सांस्कृतिक-सामाजिक ठेवा समाजासमोर ठेवावा असा उदात्त हेतू त्यांचा होता.  वृत्तपत्र हे समाजाचे अत्यंत महत्त्वपूर्ण अंग आहे हे त्यांनी जाणले होते. इंग्रजांची राजवट संपल्यानंतर आपण लोकशाही शासनप्रणालीत स्वीकारली आणि त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किती अत्यंत मोठे स्थान आहे हे आपण जाणतच आहोत. त्यामुळेच जगभरात वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानतात. आपण जर थोडे इतिहासात डोकावले तर लक्षात येते की युरोपात राजेशाही अस्तित्वात असतानाच व...