अटल बिहारी वाजपेयी : संसद मंदिरातील दीपस्तंभ

अटल बिहारी वाजपेयी : संसद मंदिरातील दीपस्तंभ २५ डिसेंबर १९२४ म्हणजे माजी पंतप्रधान स्व अटल बिहारी वाजपेयी यांचे आजपासून जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे, त्यांच्या हा कार्यकर्तृत्वाचा आढावा ग्वाल्हेरच्या एका उपनगरातील शाळा मास्तराचा मुलगा म्हणून कारकिर्दीला प्रारंभ करणारे वाजपेयी आर्य समाजाचे सदस्य झाले , संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले जनसंघाचे नेते बनले , खासदार बनले , भाजपचे संस्थापक बनले , संसदेत विरोधी पक्षनेते बनले , आणि पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण करणारे पहिले काँग्रेसेतर पक्षाचे पंतप्रधान बनले. हे स्थान मिळवून २०१५ मध्ये भारतरत्न वाजपेयींनी हिंदुस्थानच्या इतिहासाचं नव तेजस्वी पान लिहिलं. ग्वाल्हेर मधील प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या मुलाच्या दृष्टीनं हे काही सोपं काम नव्हतं. देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानांपैकी ते एक बनले ! २००९ साली आजारानं कमजोर झाले ; पण त्यापूर्वीची पन्नास वर्षे ते त्यांच्या पक्षाच्या अत्यंत उच्च वर्तुळातील महत्वपूर्ण हस्ती होते. नेमकी धोरणात्मक उद्धिष्ट असलेला आणि सीमित लोकप्रियता लाभलेला लहानसा हिंदुत्ववादी पक्ष त...