पोस्ट्स

राधाकृष्ण नार्वेकर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रभादेवी-खाडा परिसरातील आनंददायी घटना आणि ज्येष्ठ पत्रकार स्व. राधाकृष्ण नार्वेकर

इमेज
  प्रभादेवी - खाडा परिसरातील आनंददायी घटना    आणि ज्येष्ठ पत्रकार स्व . राधाकृष्ण नार्वेकर पाच दशके पत्रकारितेत अविरत काम व पत्रकारितेला आपला धर्म मानून समाजाभिमुख   पत्रकारिता करणारे एक पोटतिडकीचा पत्रकार म्हणून स्व . राधाकृष्ण नार्वेकर यांची महाराष्ट्राला ओळख . त्यांचे कौटुंबिक स्नेही पत्रकार शिवाजी धुरी यांनी त्यांच्या ८५ व्या जन्मदिवसानिमित हृद्यस्पर्शी भावना व्यक्त करणारी पोस्ट नुकतीच लिहिली होती . त्यांच्याकडून माझ्या फेसबुक वॉल वर आली . समाजासाठी ठोस असे आपण सतत काही ना काही केले पाहिजे या ध्येयाने शिक्षकीपेशा सोडून नार्वेकर यांनी पत्रकारिता निवडली होती . याचा अनुभव मी १९८६ सालापासून घेत होतो , त्यावेळी दैनिक मुंबई सकाळ प्रभादेवी दत्तमंदिर लगत असलेल्या सकाळची इमारत होती त्यातून छापला जायचा . ( सध्या त्याठिकाणी टॉवर उभा आहे ) मी सुद्धा त्यावेळी जनसामान्यांचे प्रश्न लिहीत असे .  सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्या जागेवर संपादक म्हणून नार्वेकर...