मराठी भाषा गौरव दिनानिमित्त AI तंत्रज्ञानाचा वापर करून संकल्प चित्र स्पर्धा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त AI तंत्रज्ञानाचा वापर करून संकल्प चित्र स्पर्धा 'ए.आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता' कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) हे सद्या जगभरात वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. ही आधुनिक तंत्रज्ञानातील एक महत्त्वाची क्रांती ठरणार आहे. योग्य वापराने AI आपल्या समाजाला अधिक प्रगत आणि सुसंवादी बनवू शकते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाते. याद्वारे भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील चित्र उभारले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत असल्याने साहित्य क्षेत्रात देखील वापर सुरू झाला आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी दादर सार्वजनिक वाचनालय व धुरु हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या सहकार्याने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने श्री सर्वोदय एज्...