गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब
गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब - रवींद्र मालुसरे ( अध्यक्ष , मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई) आप्पा परब ..... एक सामान्य गिरणी कामगार , दादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तके , दिवाळी अंक , नियतकालिके विकणारे विक्रेते , प्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ ते इतिहास संकलक - संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८३ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे. शिवछत्रपतींना दैवत मानणार्या या व्रतस्थ इतिहासपुरूषाशी माझा तीन तपाचा स्नेह आहे. मला लहानापासून वाचनाची प्रचंड भूक , त्यामुळे नवीन काही शोधताना दादरमधल्या रद्दीवाल्यांच्या दुकानात डोकावत असे. रानडे रोडवरील पटवर्धन ब्रदर्स हे आयुर्वेदिक दुकान सोमवारी बंद असे त्यामुळे एक दाढीधारी व्यक्ती आपल्याकडील सर्व ठेवा बंद दुकानासमोर ऐसपैस मांडत असे. ते सहज चालता बघता येत असल्याने महिन्यातून दोन तीन सोमवारी त्याठिकाणी ...