पोस्ट्स

सदगुरु रामकृष्ण भावे महाराज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर : इतिहास, परंपरा आणि नैमित्तिक कार्यक्रम

इमेज
प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर : इतिहास , परंपरा आणि नैमित्तिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय मुंबई   नगरीला ‘सोन्याची नगरी’ किंवा जगभरात आपल्या भारत देशाची औद्योगिक नगरी असेही म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल.     मुंबई   नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आज आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची,     त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर वेगवेगळ्या देवींची मंदिरेही पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिरे सुद्धा   मुंबईत आहेत. तत्कालीन   मुंबई   बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि अलीकडच्या  काळात तर झपाट्याने अस्तंगत होत चालल्या आहेत. वाड्यावस्त्यांची   मुंबई   उंचच उंच टॉवर्सच्या माध्यमातून गगनभेदी होत आकाशाला भिडत   चालली आहे.   मुंबईची जीवनशैली बदलली तरी हे शहर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे असल्याने काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे ...