पोलादपूरचे प्रतिभावान साहित्यिक, नाट्यलेखक प्रल्हाद जाधव

पोलादपूरचे प्रतिभावान साहित्यिक, नाट्यलेखक प्रल्हाद जाधव मुंबईत उद्या होत असलेल्या स्नेहसंमेलनात प्रल्हाद जाधव हे छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची मुलाखत घेणार आहेत. पोलादपूरचे सुपुत्र असलेले प्रतिभावान प्रल्हाद जाधव नक्की कोण आहेत ...त्यांचा परिचय करून देणारा हा लेख प्रल्हाद जाधव हे पोलादपूरचे. लहानपणापासून तालुक्यातील आजूबाजूचे डोंगर, नद्या त्यांना खुणावत असत. सावित्रीच्या डोहात जसे ते डुंबत असत. तसेच आडवाटेवरच्या अनेक डोंगरात त्यांनी पायपीट भटकंती केली आहे. राज्यशासनाच्या नोकरीत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पदभार सांभाळल्यानंतर प्रल्हाद जाधव माहिती व जनसंपर्क खात्याचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. ३० वर्षे शासकीय नोकरीत असताना शासनासाठी अनेक गाणी, जाहिराती, जिंगल्स, माहितीपट त्यांनी लिहिल्या आहेत. प्रल्हाद जाधव आपल्या भिडस्त आणि संकोची स्वभावामुळे आपल्या लेखनाविषयी कधी कुठे फार काही बोलताना दिसत नाहीत, ते फक्त एवढेच म्हणतात, 'माझे काम मी करीत आहे आणि पुढेही करीत राहणार आहे. प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, व्यासंगी सं...