पोस्ट्स

लक्ष्मण उतेकर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया

इमेज
पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया.... मंत्री भरतशेठ गोगावले आणि प्रवीण दरेकर  मुंबई ( रवीन्द्र मालुसरे) : - सत्कारापेक्षा आम्ही तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो आहोत. आम्ही दोघेही खेडेगावात जन्मलो आहोत, रानावनात हिंडलो आहोत. मोठे झालो असलो तरी जमिनीवरून चालणारे आहोत. आपल्या तालुक्यातील डोंगर, दऱ्याखोरी, वाटा आम्ही धुंडाळल्या आहेत त्यामुळे आपले प्रश्न काय आहेत याची आम्हाला नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. तेव्हा आमच्या दोघांच्याही सत्तेच्या पदाचा लाभ या तालुक्याला व्हावा असे आम्हाला  वाटते आहे. यापुढच्या काळात आपण सर्वानी आपल्या पोलादपूर तालुक्याची अविकसित तालुका ही ओळख पुसूया अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूरवासियांना दिली. मुंबई-ठाणे येथील पोलादपूरवासियांच्या वतीने घाटकोपर मुंबई येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना भरतशेठ गोगावले बोलत होते. भरगच्च गर्दी झालेल्या या सभागृहात पोलादपूरचे सुपुत्र आणि  बहुचर्चित छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा नागरी स...

पोलादपूर स्नेहसंमेलन सत्कारमूर्तींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय

इमेज
पोलादपूर तालुक्यातील मुंबई - ठाणे येथील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे मुख्य पाहुणे म्हणून दुर्गमहर्षी आप्पा परब तर लक्ष्मण उतेकर यांची मुलाखत घेण्यासाठी साहित्यिक प्रल्हाद जाधव उपस्थित होते. या संमेलनात माननीय लक्ष्मण उतेकर, नामदार भरतशेठ गोगावले साहेब, आमदार प्रवीणभाऊ दरेकर, मा संजीव धुमाळ, स्वप्निल पांडुरंग चव्हाण, डॉ ओंकार मारुती कळंबे, कुमार संग्राश निकम, नेहा विलास शिरावले, ऍड निलेश मारुती जाधव यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय :- माननीय लक्ष्मण उतेकर - सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नाव असलेले लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावचे. लक्ष्मण हे मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधासुधा मुलगा, सामान्य बुध्दिमत्तेचा मापदंड असलेला चारचौघांसारखा. वडीलांना शेतीकामात मदत करताना शेत नांगरणे, गाई-बैलांना चारा घालणे, गाईचे दुध काढणे या सगळ्या गोष्टी लक्ष्मण उतेकर यांनी केल्या आहेत. या सर्व काबाडकष्टांचे मला भांडवल करायचे नाही कारण माझ्या आयुष्यातील हे सर्व क्षण मी सकारात्मक जगलो,...

पोलादपूर तालुक्यातील इतिहास पुत्रांनो संघटीत व्हा !

इमेज
 जगभर नावलौकिक प्राप्त झालेल्या, स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र श्रीमंत संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे आणि स्वराज्य रक्षणाच्या अभिमानाचे दर्शन घडवणारा ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'छावा'! त्याचे दिग्दर्शक श्री. लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार चित्रनगरीचे माहेरघर असलेल्या मुंबई शहरात व्हावा अशी भावना पोलादपूर तालुक्यातील शेकडो मुंबई - ठाणेकरांकडून व्यक्त झाल्यानंतर श्री. सुभाषजी पवार, श्री. बाजीराव मालुसरे आणि श्री. किशोरजी जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मूर्त विचाराला पूर्ण स्वरूप देण्यासाठी काही दिवसांपूर्वी तातडीने दादरमध्ये प्राथमिक बैठक झाली. आणि काल ३१ मे २०२५ ला संध्याकाळी १५ जून रोजी होणाऱ्या जवेरबेन हॉल मधील कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पत्रक काढून घाटकोपरला मिटिंग झाली. सभेला उपस्थित असलेले समाजातले कार्यकर्ते, त्यांनी व्यक्त केलेला विचार, त्या विचारामागची भावना...  भविष्यात आपल्या अस्तित्वासाठी काही नवे घडावे यासाठी आम्ही स्वतः हून तयार आहोत असा दाखवणारा त्यांचा उत्साह..... मला खुप काही सांगून गेला.  आपला.... पूर्वजांचा इतिहास तेजस्वी आहे. पूर...

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

इमेज
श्री राजा शाहू  चरणी तत्पर कृष्णाजी  सुत आनाजी उतेकर किल्ले प्रतागडावरील भवानी आईच्या पूजेचा मान छत्रपती शिवाजी महाराज यांनी उतेकर घराण्याला दिला होता तेव्हा हा शिक्का शाहू महाराज यांनी उतेकर घराण्याला सरंजाम दिला तेव्हा हा शिक्का मोर्तब दिला होता. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत आणि मराठ्यांच्या इतिहासात  "उतेकर" या आडनावाचा अर्थ म्हणजे निष्ठा आणि पराक्रम! मध्ययुगीन आणि शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना याचे अनेक दाखले सापडतात.  शिवचरित्र साहित्य खंड १० कोकणच्या इतिहासाची साधने मध्ये पान नं २१ वर  याचा स्पष्टपणे उल्लेख सापडतो. उतेकर कुळ हे शिवरायांच्या स्वराज्यात गावाची पाटीलकी सांभाळत असत. शिवरायांशी प्रत्यक्ष संपर्कात असलेले महाड मधील वाळणच्या पाटलांचा उल्लेख इतिहासात  अढळतो. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात शिवरायांनी आपल्या विश्वासू मावळ्यांना वसवले होते. त्यात अनेक गावे उतेकरांची आहेत.  उतेकर कुळीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो. साताऱ्यातील जावळीच्या खोऱ्यातून सुरु झालेला प्रवास आज रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, सांगली, ठ...