पोस्ट्स

वारकरी सांप्रदाय माऊली भजन मंडळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अंबरनाथमध्ये सुवर्णामृतधारा

इमेज
  अंबरनाथमध्ये सुवर्णामृतधारा  इवलेसे रोप लावीयले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी  अंबरनाथची ओळख : केंद्र शासनाचा आयुध निर्माण कारखाना, विम्को, धरमसी मोरारजी, के.टी. स्टील आदी कारखान्यांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक औद्योगिक शहर अशी अंबरनाथची ओळख आहे. त्याचबरोबर अंबरनाथ म्हणजे मलंग गड, अंबरनाथ म्हणजे चिखलोली धरण. परंतु जागतिक पटलावर प्राचीन शिलाहारकालिन शिव मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाणारे अशीही अंबरनाथची ओळख आहे.  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजा...