वीरपुत्र प्रसवणारी भूमी फौजी आंबवडे

वीरपुत्र प्रसवणारी भूमी फौजी आंबवडे - रवींद्र मालुसरे फौजी आंबवडे गावचे सुपुत्र निखिल निवृत्ती कदम हा युवक तर सध्या लेफ्टनंट या पदावर भारतीय सैन्यात आहे त . मागच्या वर्षी विक्रोळी टागोर नगर येथे या गावातील मुंबई - ठाणेकर पाळेजत्रेच्या निमित्ताने एकत्र आले होते, त्यावेळी निखिलची भेट झाली. तरुण वयातच निखिलने उत्तुंग झेप घेतली असल्याचे दिसून आले. आता भारत - पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य चकमकी घडत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबविण्यासाठी आवाहन करून सीझफायर केले असले तरी सामारिक क्षेत्राचे अभ्यासक हा तात्पुरता युद्धविराम आहे असे भाकीत करीत आहेत. दोन्ही बाजूकडून आम्ही एकमेकांचे किती नुकसान केले आहे याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. सोशल मीडियावर यथेच्छ बदनामी सुरु आहे. परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना कणखर भूमिका घेतली आहे. भारताची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे: चर्चा, व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालू शक...