शुभमंगल ....पण सावधान !

शुभमंगल ....पण सावधान ! १९३८-३९ तालुका महाड ग्राम सुधारणा प्रसारक मराठा मंडळाचे ठराव वाचा ! मराठा समाजात लग्न समारंभ हा आनंदाचा आणि एकत्र येण्याचा प्रसंग असला तरी, गेल्या काही वर्षांत यात होणारा प्रचंड खर्च, हुंडा प्रथा आणि अनावश्यक रीतिरिवाजांमुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. मराठा समाजात लग्न समारंभात प्री-वेडिंग शूट, डीजे, मोठ्या जेवणावळी, मानपान आणि सोन्याच्या दागिन्यांचे भेटवस्तू देणे यांसारख्या प्रथा वाढल्या आहेत. या सर्वांवर लाखो रुपये खर्च होतात, ज्यामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात. याशिवाय, हुंडा प्रथेमुळे मुलींवर अत्याचार होतात आणि काही वेळा संसार मोडण्याची वेळ येते. ह.भ.प ब्रदीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अनिष्ट प्रथांवर नियंत्रण आणण्याची गरज अधोरेखित झाली. या समस्येवर चर्चा करून खर्चाला आळा घालण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आचारसंहिता ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. वैष्णवी हगवणे या तरुणीच्या मृत्यूमुळे समाजात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली. आचारसंहितेची अंमलबज...